Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: खुशखबर, विद्युत सहायक भरती अर्ज करण्यास मुदतवाढ

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी आनंदाचे बातमी आहे. महावितरण अंतर्गत निघालेल्या विद्युत सहाय्यक भरती 2024 साठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

उमेदवार आता 20 जुन 2024 पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात तसेच ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केला असेल ते आपल्या अर्जामध्ये 20 जुन 2024 पर्यंत सुधारणा करू शकतात. अर्जाची प्रिंट आऊट घेण्याचे अंतिम तारीख 5 जुलै 2024 आहे.

विद्युत सहाय्यक पदांची भरती करण्यासाठीची जाहिरात 29 डिसेंबर 2023 रोजी अधिकृत संकेतस्थळ https://www.mahadiscom.in/en/home/ वर प्रसिद्ध करण्यात आली होती. 1 मार्च 2024 पासून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना आता 20 मे 2024 पर्यंत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती २०२४ | Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Notification

अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक 06/2023 नुसार एकूण 5347 रिक्त जागांची भरती करण्याकरिता इच्छुक, पात्रता धारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

विद्युत सहाय्यक पदांची भरती सुरुवातीला तीन वर्ष कंत्राटी स्वरूपात करण्यात येते तीन वर्षानंतर उमेदवारांना महावितरण कंपनीमध्ये टेक्निशियन पदावर कायमस्वरूपी केले जाते.

१०वी आणि मान्यताप्राप्त संस्थेमधून आयटीआय उत्तीर्ण उमेदवार सदर भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करत असताना उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवार 27 वर्ष पर्यंत अर्ज सादर करू शकतात.

विद्युत सहायक शैक्षणिक पात्रता | Qualification

इलेकट्रिशिअन आयटीआय उत्तीर्ण.

रिक्त जागा तपशील | Mahavitaran Vidyut Sahayak Vacancy 2024

एकूण रिक्त जागांची संख्या 5347 आहे.

Age Limit

Minimum Age18 Years
Maximum Age27 Years

Vidyut Sahayak Salary 2024

विद्युत सहाय्यक पदावर निवड झालेल्या उमेदवारांना तीन वर्षाच्या कंत्राट कालावधीमध्ये पुढील प्रमाणे वेतन दिले जाते.

  1. पहिल्या वर्षी 15 हजार रुपये प्रति महिना
  2. दुसऱ्या वर्षी 16 हजार रुपये प्रति महिना तर
  3. तिसऱ्या वर्षी 17 हजार रुपये प्रति महिना देण्यात येते.

तीन वर्षाचे कंत्राटी कालावधी पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना कंपनीच्या नियमानुसार टेक्निशियन पदाचे वेतन देण्यात येते.

Application Fee

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये तर मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी 125 रुपये अर्ज शुल्क आहे.

Selection Process | निवड पद्धत

उमेदवारांची निवड ऑनलाइन सीबीटी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्यात येते.

Important Date

Notification Out29/12/2024
Apply Online1/03/2024
Last Date to Apply20/06/2024
Official websitemahadiscom.in
Apply Onlinehttps://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
NotificationClick Here

How To Apply For Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 | विद्युत सहायक अर्ज कसा करावा

  • इच्छुकांनी प्रथम https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/ या अधिकृत वेबसाईट वर जा.
  • आता उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या नवीन नोंदणी या बटनावर क्लिक करा.
  • तुमची माहिती टाकून नोंदणी पूर्ण करा.
  • आता ऑनलाईन अर्ज भरा.
  • आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे अपलोड करा.
  • अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरा.
  • अर्ज सबमिट करा.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती अर्ज सादर करत असताना लागणारी कागदपत्रे

  • उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो
  • जातीचा दाखला
  • जात वैधता प्रमाणपत्र
  • उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • डोमेसाईल
  • दहावीचे प्रमाणपत्र
  • आयटीआयचे प्रमाणपत्र
  • मोबाईल क्रमांक
  • ई-मेल आयडी
  • उमेदवाराची सही
  • डाव्या हाताच्या अंगठ्याचे ठसे
  • स्वहस्तलिखित डिक्लेरेशन

Overview

OrganizationMaharashtra State Electricity Distribution Company Limited
Advt No 06/2023
Post NameElectrical Assistant
Total Vacancy5347 Posts
QualificationITI Pass
Age Limit18-27 Years
Job LocationMaharashtra
Job TypeITI Jobs
Last Date20 May 2024
Websitewww.mahadiscom.in
Join WhatsApp Group Join WhatsApp Group