Maharashtra Krushi Sevak Result 2024: कृषी सेवक भरती २०२४ निकाल जाहीर असा बघा तुमचा निकाल

Maharashtra Krushi Sevak Result 2024: कृषी सेवक भरती 2024 ची परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. महाराष्ट्र कृषी विभागामार्फत कृषी सेवक पदाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

राज्य शासनाच्या कृषी विभागाचे अधिकृत संकेतस्थळ https://krishi.maharashtra.gov.in/ वर कृषी सेवक पदांचे तात्पुरती निवडयादि/ गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दिनांक 12 मार्च 2024 व 2 एप्रिल 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादीवर आलेल्या हरकती विचारात घेऊन सदर सुधारित तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी तयार करण्यात आलेली आहे.

राज्यातील रिक्त असणारी कृषी सेवक पदे भरण्याकरिता इच्छुक पात्रता धारक उमेदवारांकडून 14 सप्टेंबर 2023 ते 3 ऑक्टोबर 2023 या कालावधी दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते.

यशस्वीरित्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा IBPS कंपनी मार्फत 16 जानेवारी 2024 आणि 19 जानेवारी 2024 रोजी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती.

Maharashtra Krushi Sevak Result 2024 | कृषी सेवक निकाल 2024 बघण्याची पद्धत

  • उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ https://krishi.maharashtra.gov.in/ वर जावे.
  • आता नवीन घडामोडी या पर्यायावर क्लिक करा.
  • प्रतीक्षा यादी व निवड यादी तुम्हाला या पेजवर दिसतील.
  • तुम्ही अर्ज सादर केलेल्या विभागाची यादी डाऊनलोड करा.
Official Websitehttps://krishi.maharashtra.gov.in/
ResultMerit List
Other ResultClick Here
Join WhatsApp Group Join WhatsApp Group