जनसेवा अर्बन बँकेत शिपाई, क्लार्क व शाखाधिकारी पदांची भरती, 10वी पास ते पदवीधर करा अर्ज….

जनसेवा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, कुंडल येथे शिपाई, क्लार्क आणि शाखाधिकारी पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी ते पदवीधर अर्ज करू शकतात.

अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल तर ऑनलाईन मध्ये तुम्ही ईमेल द्वारे अर्ज पाठवू शकता. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

जनसेवा अर्बन बँक भरती 2024 | Janseva urban Bank Bharti 2024

  • बँक: जनसेवा अर्बन बँक
  • रिक्त जागा: 20
  • पदे: शिपाई, क्लार्क, शाखाधिकारी
  • नोकरी ठिकाण: सांगली
  • शिक्षण: 10वी ते पदवीधर
  • अर्ज शुल्क: नाही
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन किंवा ऑफलाईन
  • अंतिम तारीख: 30 एप्रिल 2024

शैक्षणिक पात्रता तपशील

शिपाई: शिपाई पदाकरिता दहावी पास उमेदवार अर्ज करू शकतात. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

क्लार्क: बी. कॉम उत्तीर्ण, बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

शाखाधिकारी: एम.कॉम/ बी. कॉम उत्तीर्ण, बँकिंग क्षेत्रात कामाचा अनुभव आणि संगणक प्रशिक्षित असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

हे पण वाचा: हॉस्पिटल मध्ये जॉबची संधी

रिक्त पदांचा सविस्तर तपशील

एकूण रिक्त जागा 20 आहेत. पदानुसार रिक्त जागांचा तपशील खालील प्रमाणे आहे.

शिपाई05
क्लार्क10
शाखाधिकारी05

अर्ज सादर करण्याची प्रक्रिया

मित्रांनो वरील भरतीसाठी तुम्ही इच्छुक असाल तर ऑनलाईन अथवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता.

ऑफलाईन अर्ज पद्धत: यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज व व इतर शैक्षणिक कागदपत्रे पोस्टामार्फत जाहिरातीत नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज पद्धत: पुढील ईमेल आयडीवर तुम्ही तुमचा अर्ज व इतर शैक्षणिक प्रमाणपत्र पाठवू शकता. jansevapatsanstha88@gmail.com.

मित्रांनो लक्षात ठेवा, 30 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज सादर करावा लागणार आहे त्यानंतर पाठवलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

अर्ज लिंक्स

अधिकृत जाहिरातwww.jansevaurban.com
जाहिरातबघा
Join WhatsApp Group Join WhatsApp Group