Bombay High Court Peon Hamal Short List 2023: बॉम्बे हाय कोर्ट शिपाई/ हमाल शॉर्टलिस्ट

Bombay High Court Peon Hamal Short List: मुंबई उच्च न्यायालय शिपाई/ हमाल पद भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. मुंबई उच्च न्यायालयामार्फत शिपाई/ हमाल पदाकरिता निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

न्यायालयामार्फत आत्ताच शिपाई/ हमाल पदाकरिता पात्र असणाऱ्या उमेदवारांची निवड यादी तयार करण्यात आली आहे या यादीत नाव असणाऱ्या उमेदवारांनी आपले कागदपत्र पडताळणीसाठी 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्ट मार्फत पाठवावेत.

मुंबई उच्च न्यायालयामार्फत 21 मार्च 2023 रोजी शिपाई/ हमाल या पदांची भरती करण्याकरिता जाहिरात जारी करण्यात आली होती. त्यानुसार १३३ पदांची भरती करण्याकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते.

जिल्हा परिषद महाभरती प्रवेश पत्र

Bombay High Court Peon Hamal Short List 2023 Overview | बॉम्बे हाय कोर्ट शिपाई/ हमाल शॉर्टलिस्ट

OrganizationBombay High Court
Advt. No.Peon/Hamal
Post NamePeon/ Hamal
Total Posts133 Posts
Qualification7th Pass
Job LocationMaharashtra
Job TypeGovt Jobs
Article CategoryShort List
Short List StatusDeclared
Released Date20 September 2023
Official websitebombayhighcourt.nic.in
Telegram GroupJoin

Bombay High Court Peon Shortlist 2023 PDF Download Process

कागदपत्र पडताळणीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी डाऊनलोड करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. उमेदवारांनी खालील यादी डाऊनलोड करून यामध्ये आपले नाव शोधावे जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर 7 ऑक्टोबर 2023 च्या अगोदर खाली नमूद केलेले कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या पत्त्यावर पाठवावेत.

उमेदवारांनी हे कागदपत्रे फक्त स्पीड पोस्टामार्फतच पाठवायचे आहेत. इतर कुठल्याही माध्यमाद्वारे पाठवलेले कागदपत्रे विचारात घेतली जाणार नाहीत. उमेदवारांनी आपली कागदपत्रे 7 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोचतील अशा पद्धतीने पाठवावी. सदर तारखे नंतर आलेल्या कागदपत्रांचा विचार केला जाणार नाही.

Bombay High Court Hamal Shortlist Documents | उमेदवारांनी स्पीड पोस्टद्वारे खालील कागदपत्रे पाठवावे.

  • ऑनलाइन अर्जाची प्रत (अर्जावर नोंदणी क्रमांक असणे आवश्यक)
  • शाळा सोडल्याचा दाखला.
  • शैक्षणिक कागदपत्रे.
  • मागासवर्गीयांसाठी जातीचा दाखला.
  • जर नावात बदल झालेला असेल तर त्या संबंधित सक्षम प्राधिकरणाने जारी केलेला दाखल्याची प्रत

Bombay High Court Peon Hamal List 2023

शिपाई/ हमाल पदासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 24 मे 2023 पासून चालू झाली होती तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 7 एप्रिल 2023 होती. ७वी पास उमेदवार शिपाई/ हमाल पदाकरिता अर्ज करण्यास पात्र होते. उमेदवारांना नोंदणी करताना 25 रुपये नोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे होते.

एकूण 133 जागांची भरती करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते. 5000 उमेदवारांची शॉर्टलिस्ट उच्च न्यायालयामार्फत नुकतीच जारी करण्यात आले आहे.

Official websitebombayhighcourt.nic.in
Short ListSee
Other JobsApply

Leave a Comment