ZP Vistar Adhikari Exam Date 2023: मित्रांनो जिल्हा परिषद भरती परीक्षांचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट जारी करण्यात आले आहे. आयबीपीएस मार्फत शनिवार दिनांक ७ ऑक्टोबर २०२३ पासून ऑनलाईन परीक्षा राज्यभरात विविध परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे.
ZP Vistar Adhikari Sankhyiki या पदासाठी अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ZP Vistar Adhikari Krushi या पदाचे प्रवेश पत्र सुद्धा जारी करण्यात आले आहेत. उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन आपले प्रवेश पत्र डाउनलोड करावेत.
विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची परीक्षा रविवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी तिसऱ्या शिफ्ट मध्ये होणार आहे तर विस्तार अधिकारी कृषी या पदाची परीक्षा १० ऑक्टोबर२०२३ रोजी दुसऱ्या शिफ्ट मध्ये होणार आहे. उमेदवारांनी ज्या जिल्हा परिषदेसाठी अर्ज केला असेल त्याचे परीक्षांचे वेळापत्रक नक्की बघून घ्यावे.