Talathi Bharti Payment Pending | Talathi Login Payment Online

Talathi Bharti Payment Pending: मित्रानो तलाठी भरतीसाठी अर्ज करताना बऱ्याच उमेदवारांना एक प्रॉब्लेम येत आहे तो म्हणजे अर्ज शुल्क भरताना पेमेंट फेल होत आहे. मात्र बँकेच्या खात्यातून पैसे हि कपात होत आहे. जर असा प्रॉब्लेम तुम्हाला आला असेल तर त्वरित खालील पर्यायांचा वापर करून रिफंड साठी विनंती करा.

हा Talathi Bharti Payment Issue अधिकतर युपीआय मार्फत अर्ज शुल्क भरणाऱ्या उमेद्वारां येत आहे, त्यामुळे तुम्ही डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन पेमेंट करावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येतो.

जर तुम्ही पेमेंट केले असेल व तुम्हाला कुठलाही Talathi Bharti Payment Problem येत असेल तर तुम्ही सर्वात आधी खाली सांगितल्या प्रमाणे नवीन तिकीट जनरेट करायचे आहे. असे केल्यांनतर तुम्हाला लवकरात लवकर रिफंड मिळेल अथवा तुम्ही सेकंड पेमेंट केले नसेल तर तुमचा फॉर्म ७२ तासांत सबमिट केला जाईल.

Talathi Bharti Payment Pending: Talathi Login Payment Online रिफंड साठी अप्लाय कसे करावे?

उमेदवारांनी सर्वप्रथम आपल्या खात्यात लॉगिन करायचे आहे.

 • त्यासाठी अधिकृत वेबसाईट: https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html वर जा.
 • आता तुमचा अर्ज क्रमांक व पासवर्ड टाकून लॉगिन करा.
 • नवीन पेज उघडेल, डाव्या कोपऱ्यात वरती असणारी हेल्पडेस्क या पर्यायावर क्लिक करा.
 • आता उजव्या हाताच्या कोपऱ्यातील Raise a Query या बटनावर क्लिक करा.
 • आता तुमच्या समोर Candidates Query Form उघडेल
 • या फॉर्म मध्ये तुम्हाला आलेला प्रॉब्लेम सांगा.
 • पेमेंट केल्याचे स्क्रिनशॉट अपलोड करा.
 • व सरते शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा.
 • आता ७२ तासांच्या आत तुमचा पेंडिंग असणारा फॉर्म ऑटोमॅटिक सबमिट होईल.
 • जर तुम्ही रिफंड साठी विनंती केली असेल तर रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होतील.

मित्रानो वरील प्रक्रिया केल्या नन्तर तुमचा फॉर्म निश्चितच सबमिट होणार आहे. त्यामुळे उगाच टेन्शन घेऊ नका ११ लाखाच्या वर अर्ज आलेले आहेत. स्पर्धा भयंकर वाढली आहे, त्यामुळे आपले लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित करा.

Talathi Bharti 2023 Helpline Number

तुम्ही खाली दिलेल्या हेल्पलाईन नम्बर वर कॉल करून माहिती घेऊ शकता.

 • Technical: 919513438043
 • Non-Technical: 02025712712

कॉल करण्याचा कालावधी: सकाळी १० ते संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत (सोमवार ते शनिवार)

अशाच अपडेट्स साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.

Payment of Talathi

Leave a Comment