Talathi Bharti Hall Ticket 2023 Maharashtra: मित्रांनो राज्यात आत्ताच तलाठी पदाच्या रिक्त जागा भरण्याकरिता अधिसूचना जारी करण्यात आली होती. सदर भरती करिता राज्यातून सुमारे 13 लाख उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत.
टी.सी.एस मार्फत नुकत्याच उमेदवारांच्या परीक्षेच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून उमेदवारांना त्यांचे प्रवेश पत्र लवकरच उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
Talathi Bharti Hall Ticket 2023 Date: तलाठी भरती प्रवेश पत्र तारखा
टीसीएस मार्फत तलाठी भरती 2023 चे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लवकरच उमेदवारांना त्यांच्या लॉगिन मध्ये प्रवेश पत्र ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राचे ठिकाण उमेदवारांना त्यांच्या ईमेल व मोबाईल क्रमांकावर देखील कळवले जाणार आहे.
Talathi Bharti 2023 Exam Date Maharashtra
तलाठी भरती 2023 ची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधी दरम्यान टीसीएस मार्फत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. उमेदवारांणी आपले प्रवेश पत्र www.mahabhumi.gov.in या वेबसाईट ला भेट देऊन डाऊनलोड करून घ्यावे.

Talathi Admit Card 2023 Download Link
उमेदवारांना त्यांच्या परीक्षा केंद्राचे ठिकाण पाच ते सहा दिवस आधीच कळवले जाईल तर प्रवेश पत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
तलाठी भरती 2023 ची परीक्षा ही एकूण 19 दिवस चालणार असून परीक्षेचे आयोजन एका दिवसात तीन सत्रात करण्यात आले आहेत.
How to Download Talathi Admit Card 2023
- सर्वप्रथम उमेदवारांनी www.mahabhumi.gov.in या वेबसाईट वर जावे.
- त्या नंतर तलाठी भरती 2023 या लिंक वर क्लिक करा.
- आता तुमचा युजर आयडी व पासवर्ड टाकून प्रोफाईल मध्ये लॉगिन करा.
- आता तुम्हाला डाऊनलोड ॲडमीट कार्ड का पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- तुमचे हॉल तिकीट डाऊनलोड होईल. त्याची एक प्रत काढा.