Gold Loan Information In Marathi: भरतीय संस्कृतीत फार पूर्वी पासून सोने हे संपत्ती व प्रतिष्ठेचे प्रतीक समजले जाते. सोने हा केवळ एक मौल्यवान धातू नसून आर्थिक अडचणीच्या काळात उपयोगी पडणारे धन आहे.
आर्थिक चणचणीच्या काळात व्यक्तीला तात्काळ व कमी त्रासात गोल्ड लोन मिळत असण्याने त्याची लोकप्रिय अधिकच वाढत आहे. मित्रांनो आजच्या धाकाधकीच्या युगात सोनेतारण कर्ज सुविधा सामान्य नागरिकांसाठी फारच उपयोगाचे ठरत आहे.
कारण आपल्याला कधीही आर्थिक अडचण भासली तर आपण आपल्याकडे असणाऱ्या सोन्यावर कर्ज मिळवून आपली आर्थिक अडचण दूर करू शकतो. इतर कर्जांच्या तुलनेत हे कर्ज अधिक जलद व कमीत कमी कागदपत्रावर मिळते.
गोल्ड लोन हे एक सुरक्षित कर्ज आहे. जिथे तुम्ही कर्जाच्या रकमेच्या बदल्यात सोन्याचे दागिने, नाणी किंवा इतर वस्तू बँक/ वित्तीय संस्थेकडे तारण ठेवता. हे कर्ज आपण विविध कारणांसाठी जलद व सोयीस्कर मार्गाने घेऊ शकतो. जसे शिक्षण, आर्थिक अडचणी, गाडी, घर खरेदी व इतर.
Gold Loan Information In Marathi Overview | गोल्ड लोन माहिती
Article Name | Gold Loan Information |
---|---|
Article Type | Finance |
Nationality | Indian |
Cibil Score | Not required |
Gold Quality | 18 karat |
Bank | All Banks |
Telegram Channel | Join |
Gold Loan Process In Marathi | गोल्ड लोन घेण्याची प्रक्रिया
गोल्ड लोन मिळवणे ही एक साधी, सोपी आणि सरळ प्रक्रिया आहे. गोल्ड लोन घेण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागते.
मूल्यमापन: प्रथम, कर्ज हव्या असणाऱ्या व्यक्तीला सोन्याच्या वस्तू बँकेतील लोन अधिकाऱ्याकडे घेऊन जावे लागते, तो सोन्याची शुद्धता, वजन आणि सध्याचे बाजार दर यासारख्या घटकांवर आधारित त्यांचे मूल्य मूल्यांकन करतो.
दस्तऐवजीकरण: सोने तारण ठेवणाऱ्या व्यक्तीकडे सोन्याच्या दागिन्यांसह ओळख आणि पत्त्याचा पुरावा असणे गरजेचे आहे. काही वित्तीय संस्था उत्पनाचा पुरावा देखील मागू शकतात.
कर्जाच्या रकमेचे निर्धारण: एकदा तुमच्या दागिनाचे मूल्यांकन पूर्ण झाले कि बँक तुम्ही पात्र असलेल्या कर्जाची रक्कम ठरवते. सामान्यतः सोन्याच्या मूल्याची टक्केवारी वर हि रक्कम ठरवली जाते.
कर्ज मंजूरी: जर तुम्ही कर्जाच्या अटींशी सहमत असाल, तर बँक तुम्हाला कर्जाची रक्कम वितरित करेल.
परतफेड: सुवर्ण कर्जाचा कालावधी सामान्यत: काही महिन्यांपासून काही वर्षांपर्यंत असतो. तुम्ही कर्जाची रक्कम ईएमआय मध्ये किंवा मुदतीच्या शेवटी एकरकमी देऊ शकता.
Benefits of Gold Loans | गोल्ड लोनचे फायदे
जलद व कमी कागदपत्र या बरोबरच गोल्ड घेण्याचे खालील प्रमाणे काही फायदे आहेत.
जलद वितरण: गोल्ड लोन जलद मिळत असण्याने अधिक लोकप्रिय झाले आहे. कर्ज मंजुरीची प्रक्रियाही इतर कर्जाच्या तुलनेत लवकर होत असल्याने लोक गोल्ड लोन घेण्यास अधिक पसंती देतात.
क्रेडिट स्कोर तपासणी नाही: इतर कर्ज घेण्यासाठी कर्जदाराच्या सिबिल स्कोर चांगला असावा लागतो, मात्र गोल्ड लोन याला अपवाद आहे. सुवर्ण कर्जांना क्रेडिट तपासणीची आवश्यकता नसते. कर्जदाराची पात्रता केवळ सोन्याच्या मूल्यावर आधारित आहे.
कमी व्याजदर: गोल्ड लोन वैयक्तिक कर्ज अथवा इतर कोणत्याही कर्जाच्या तुलनेत कमी व्याजदराणे मिळते.
परतफेड: कर्जदार नियमित ईएमआय द्वारे अथवा मुदतीच्या शेवटी एक रकमी फेड करू शकतो या व्यतिरिक्त विविध परतफेडी पर्यायांमधून तुम्ही तुमच्या आवडीचा पर्याय निवडू शकता.
कोणतेही वापर प्रतिबंध नाही: तुम्ही कर्जाची रक्कम कोणत्याही कारणासाठी वापरू शकता, मग ते वैद्यकीय खर्च, शिक्षण, व्यवसाय विस्तार किंवा सहल असो. कर्जदारावर कोणतेही प्रतिबंध नसते.
Considerations Before Opting for a Gold Loan | गोल्ड लोन घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या
सोने तारणपूर्वी, खालील बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे:
व्याजदर: तुम्हाला योग्य व्याजदर मिळावा यासाठी वेगवेगळ्या बँक/ वित्तीय संस्था यांच्या व्याजदरांची तुलना करा.
मूल्य प्रमाण:: तुम्हाला मिळणाऱ्या कर्जाची रक्कम ही तुमच्या कडील असणाऱ्या सोन्याच्या दागिन्यांच्या मूल्याची टक्केवारी असते. बँकेने सादर केलेले कर्ज-ते-मूल्य गुणोत्तर तुम्हाला समजले असल्याची खात्री करा.
परतफेड अटी: तुमच्या आर्थिक परिस्थितीला अनुकूल असा कालावधी आणि परतफेड पर्याय निवडा.
सोन्याची सुरक्षा: वित्तीय संस्थेने तुमच्या सोन्याच्या वस्तूंचे रक्षण करण्यासाठी योग्य सुरक्षा उपायांचे पालन केले कि नाही याची खात्री करा.
Gold Loan Documents List | कागदपत्रे
- अर्ज
- पॅन कार्ड
- ओळखीचा पुरावा
- पत्त्याचा पुरावा
- वयाचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
Conclusion
आपल्या भारतीय संस्कृतीत मुलीच्या लग्नात तिला सोने दिले जाते कारण अडचणीच्या वेळेस हे सोने तारण ठेवून अडचण दूर करता येते. सणासुदीला सोने खरेदी करणे ही एक हौस म्हणूनच मर्यादित न राहता एक भविष्यातील गुंतवणूक म्हणून याकडे बघण्याचा दृष्टिकोन झाला आहे.
ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून आपण गोल्ड लोन घेऊ शकतो. इच्छुकांनी संबंधित बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे. बँकेच्या असणाऱ्या अटी व पात्रता कर्जदार पूर्ण करत असेल तर तो गोल्ड लोन साठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतो. सविस्तर माहितीसाठी जवळच्या बँक शाखेशी संपर्क साधावा