Essay On Rainy Season In Marathi 150 Words: आपल्या भारत देशात एकूण तीन मुख्य ऋतू आहेत. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे सर्व ऋतू प्रत्येकी चार महिने असतात. म्हणजेच सर्व ऋतू मिळून एकूण बारा महिने होतात.
या तिन्ही ऋतूंपैकी पावसाळा हा माझा आवडता ऋतू आहे. पावसाळा ऋतू सर्वांना आनंद देणारा व विशेषता शेतकऱ्यांसाठी अत्यानंद देणारा आहे. पावसाळा मला सर्वात जास्त का आवडतो याचे सविस्तर वर्णन मी खाली केले आहे.
Essay On Rainy Season In Marathi 10 Lines | माझा आवडता ऋतू पावसाळा निबंध
पावसाळा ऋतू जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये असतो. पावसाळ्याची सुरुवात जून महिन्यातील ०७ तारखेपासून होते जशा पहिल्या पावसाच्या सरी जमिनीवर घेऊन आदळतात, त्यावेळी येणारा मातीचा तो खरपूस सुगंध मनाला मोहित करून टाकतो.
लेखाचा प्रकार | निबंध |
---|---|
विषय | पावसाळा निबंध मराठी 10 ओळ |
इयत्ता | १ली ते १०वी |
भाषा | मराठी |
ऋतू | पावसाळा |
देश | भारत |
महिने | जुन ते सप्टेंबर |
~पावसाळ्यातील छत्री व इतर साहित्य>Check on Amazon
Essay On My Favourite Season Rainy In Marathi
परिसरातील वातावरण मनाला प्रसन्न करून टाकणारे होते. या पावसामध्ये ओलचिंब होण्याची मजा वेगळीच असते. पावसाळ्यात पाऊस सुरू झाला की कोकीळा पक्षाचे ते मंजुळ आवाजाचे गाणे आपोआपच आपली मने त्याच्याकडे आकर्षित करते, जसे श्रीकृष्णाच्या बासुरीने गोपिकांना आकर्षित करावे.
पावसाळा या ऋतू मध्ये गावातील नद्या, ओढे, तलाव, विहिरी यांना भरपूर पाणी येते या ठिकाणी त्या पाण्यात अंघोळ करायला मला फार आवडते. रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही या नदीच्या पाण्यात मासे पकडण्यासाठी आवर्जून जातो.
Short Essay On Rainy Season In Marathi
पाऊस आला की आमच्या अंगणामध्ये पाणी साचते या पाण्यामध्ये कागदाच्या होड्या बनवून सोडण्यास घरातील मुले आतुर होतात. वर्षभरात झाडाला आपण कितीही पाणी टाका परंतु नैसर्गिक पाऊस झाला की झाडांवरती एक नवीन वेगळीच चमक येते जणू एखाद्या पेशंटला सलाईन दिल्यानंतर जशी टवटवी येते त्याचप्रमाणे झाडे आनंदात वाऱ्याच्या झोक्या बरोबर डूलताना दिसतात.
पाऊस आल्यानंतर घरापासून परिसरात सगळीकडे हिरवेगार गवत होते त्यामुळे घर आणखीनच शोभून दिसते या हिरव्यागार मैदानात मित्रांसोबत खेळ खेळायला मला खूप आवडते. पावसाळ्यात बऱ्याच वेळा वीज नसल्याने नळाला पाणी येत नाही त्यावेळी आम्ही घराच्या छतावरून खाली पडणारे पाणी टाकीत साठवून ठेवतो.
Small Essay In Marathi On Rainy Season
आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे व शेती हा येथील प्राथमिक व्यवसाय सुद्धा आहे. भारतातील सर्वाधिक लोकसंख्या शेती व्यवसायात गुंतलेली आहे या शेती करणाऱ्या आपल्यासारख्या शेतकऱ्यांसाठी पावसाळा ऋतू देवाकडून मिळालेला वरदानच आहे.
उन्हाळ्यामध्ये शेतीची नांगरट करून पावसाळ्यामध्ये त्यात बियांची लागवड करून येणारे पीक व त्यातून मिळणारे उत्पन्न यावर आपण शेतकरी लोक जीवन व्यतीत करत आहोत. व या जगाच्या पोशिंद्या मुळे इतर व्यवसायात गुंतलेले लोकांचे जीवन सुखमय आहे.
Rainy Season Essay In Marathi Language
पावसाळा या ऋतू मध्ये येणाऱ्या पावसाच्या पाण्यापासूनच नदी, तलाव, सरोवरे, विहिरी व महासागरे यामध्ये पिण्याचे पाणी जमा होते व तेच पाणी आपल्या घरातील नळांमधून आपल्याला पिण्यास उपलब्ध करून दिली जाते. याच पावसाच्या पाण्यापासून वीज निर्माण केली जाते. त्यामुळे पावसाळा या ऋतूला अनन्यसाधारण महत्त्व आहे व याच कारणांमुळे पावसाळा हा माझा सर्वात आवडता ऋतू आहे.
Importance Of Rain In Marathi
पावसाळा ऋतूचे महत्व खालील प्रमाणे आहे.
- पासून आल्याने तप्त जमिनीची तहान भागते.
- शेतातील पिकांना पाणी मिळते.
- विहिरी, तलाव, नद्या, धरणे भरतात.
- पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होते.
- झाडांचे पोषण झपाट्याने होते.
- जमिनीची धूप रोखीली जाते.
- कोरडा दुष्काळ पडत नाही.
- नोकरीच्या संधी निर्माण होतात.
Pavsala Nibandh In Marathi
उन्हाळ्यात तप्त झालेल्या जमिनीला गारवा देण्याचे काम पावसाळा ऋतू करतो व आपल्यालाही गर्मीपासून सुटकारा या ऋतूमध्ये मिळतो. पावसाळ्यात बालमित्रांच्या तोडून एकच कविता ऐकायला मिळते ती म्हणजे “येरे येरे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा“.
पावसाळ्यात वातावरणात कमालीचे बदल होतात ती पाण्याने भरलेली ढगे कधी धो-धो, कधी रिमझिम तर कधी कडाडून वीज चमकून पाऊस बरसवतात तर या विजेच्या कडकडाच्या संगीताला बेडूक ही डराव डराव करून प्रतिसाद देतात. पावसाळ्यामध्ये कोकिळा पक्षाबरोबरच इतर पक्षांनाही फार आनंद होतो.
पक्षांचा राजा मोर तर आपला पिसारा फुलवून पावसाच्या तालीवर नाचण्यास सुरुवात करतो. तो सप्तरंगी असणारा देखणा इंद्रधनुष्य पावसाळ्यातच आपल्या नजरेस पडतो जणू ते इंद्रदेवाचे आसनच आहे असे आपल्याला वाटते. पावसाळ्यामध्ये रंगबिरंगी छत्र्या व रेनकोट घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते बाहेर रिमझिम पावसाच्या झरा पडत असताना गरमागरम चहा सोबत पकोड्यांचा आस्वाद घेणे काही लोकांना फारच आवडते.
FAQ’s On Maza Avadta Rutu Marathi N
What is rainy season in Marathi?
पावसाळा ऋतू
What is mean by monsoon season in marathi?
पावसाळा/ वर्षा ऋतू